प्रा.जयसिंह ओहोळ यांच्या सामाजिक कार्याचा आमदार निलेश लंके यांच्याहस्ते गौरव..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषबापू ओहोळ यांचे सुपुत्र प्रा जयसिंह ओहोळ यांनी आजवर सामाजिक स्तरावर त्यांनी विविध रुग्णास व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली आहे. यांचे शिक्षण (MA, PhD App, SET, NET, NET, JRF ) झाले असून त्यांना विश्व विद्यापीठ अनुदान आयोग व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार द्वारे रुपये सत्तावीस लाख रुपयांची राष्ट्रीय फेलोशिप प्राप्त झाली आहे. ते सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रिसर्च फेलो आहेत. नुकताच त्यांचा अहमदनगर येथे आमदार निलेश लंके यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रा.जयसिंह ओहोळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आ.लंके यांनी स्वतः प्रास्ताविक करून प्रा जयसिंह ओहोळ यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. यावेळी रविंद्र भोसले व पप्पू पोळ यांनाही सन्मानित करण्यात आले. प्रा जयसिंहओहोळ हे वैद्यकीय व शैक्षणिक मदतीसाठी तत्पर असतात. आजवर त्यांच्या सामाजिक. व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक संस्थानी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवाय ते आपल्या लेखणीतून कविता, विविध संपादकीय लेख.. विविध वेबसिरिजचे लेखन केले आहे. याशिवाय ते व्यंगचित्र ही उत्तमरीत्या काढतात.. आपल्या या व्यासंगातुन त्यानी साडे सात हजार पुस्तके आपल्या संग्रही पिडीएफ स्वरूपात संग्रह केली आहेत. याची दखल परदेशात देशात घेतली गेली आहे. प्रा.जयसिंह ओहोळ हे हिवरे (ता.करमाळा) येथील रहिवासी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषबापू ओहोळ यांचे सुपुत्र आहेत.