करमाळा शहरामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी..! - Saptahik Sandesh

करमाळा शहरामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र (रमजान ईद) उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली व नमाज पठण केले.

याप्रसंगी नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले. करमाळा शहर काझी यांनी हिंदू व मुस्लिम बांधवांना शांततेची अपील केली तर कोणत्याही समाजावर अन्याय व अत्याचार होणार नाही, यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे, तरच आपण देश हिताकडे जाऊ असे सांगितले. तसेच जागतिक आतंकवाद वाढण्यास अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व इटली हे देश जबाबदार आहेत असे सांगितले याप्रसंगी अनेकांनी ईद च्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!