अजमेर येथे आंतरराष्ट्रीय सुपर मेमरी ट्रेनिंग संपन्न-महाराष्ट्रातून करमाळ्याच्या प्रा. ज्योती मुथा यांचा समावेश
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अजमेर ( राजस्थान) येथे बॅगलेस ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर मेमरी ट्रेनिंग (मेमरी ऑफ सायन्स) हे शिबीर नुकमतेच संपन्न झाले आहे. विशेष म्हणजे या शिबीरासाठी महाराष्ट्रातून करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका प्रा. ज्योती मुथा यांची निवड झाली होती व त्या या शिबीरासाठी जाऊन आल्या आहेत.
या संस्थेच्या वतीने देश व विदेशातील मेमरी ऑफ सायन्सच्या दृष्टीने मान्यवर संस्थांच्या प्रतिनिधीला आमंत्रित केले होते. या संस्थेने ज्यांना निमंत्रित केले होते, त्यांचा प्रवास खर्च, निवास भोजन व ट्रेनिंग अशी व्यवस्था केली होती. या शिबीरात संस्थेचे प्रमुख व मेमरी ऑफ किंग पुरस्कार प्राप्त नवीन आगरवाल तसेच प्रा. नरेंद्र, प्रा. दिपक, प्रा. प्रिती, प्रा. मोनिका आदींनी मार्गदर्शन केले.
तसेच सहभागी शिबीरार्थीकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
बॅगलेस इंडिया लि; या संस्थेने अजमेर येथे घेतलेल्या शिबीरासाठी मला खास आमंत्रित केले, त्याचा मला विशेष आनंद तर आहेच पण त्याचा फायदाही झाला. या शिबीरात मेमरीच्या दृष्टीने जे मार्गदर्शन झाले ते अनमोल असे होते. याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. या शिबीरातून मिळालेले ज्ञान अबॅकस व वैदिक मॅथ्स च्या दृष्टीने खूपच लाभदायक झाले आहे.
… प्रा. ज्योती मुथा (संचालिका – मुथा अबॅकस अकॅडमी)