प्रज्ञाशोध परिक्षेत भांगे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.. - Saptahik Sandesh

प्रज्ञाशोध परिक्षेत भांगे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे

करमाळा : कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्या मंदिर या प्रशालेतील विद्यार्थी यांनी 26 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथे झालेल्या प्रज्ञाशोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये ईश्वरी गोडसे राजविरा शिरसट अनुष्का मांडवे अल्फेया जहागिरदार दिशा केदार आर्या इंगळे संग्राम उबाळे शिवतेज गोंदील मोहम्मद अली मुलानी स्वरांजली उबाळे यशराज आरकिले जोया शेख श्रावणी पांडव नयन भोजने कीर्ती कदम प्रणव सुरवसे प्राची मांडवे शिवम राखुंडे अथर्व मुळे ईश्वरी पवार ज्ञानेश्वरी ननवरे रुद्र सोंडगे राजवीर राखुंडे या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. तरी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव प्राध्यापक सुनील भांगे मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे आणि शिक्षकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!