देवळाली येथील यात्रा उत्साहात – आ.शिंदे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर देवळाली (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची यात्रा नुकतीच संपन्न झाली, यात्रेचे मुख्य आकर्षण पहिला टप्पा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम साडेसहा वाजता करण्यात आला.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते, तसेच गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानंतर भाविकांनी शेरनी वाटपाचा कार्यक्रम ढोल ताशा डीजे व हलग्याच्या गजरात संपन्न झाला तसेच श्री ग्रामदैवत नागनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आमदार संजयमामा शिंदे उपस्थित होते.
उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे लोकांची पाणीची गैरसोय होऊ नये म्हणून कै.कल्याणभाऊ गायकवाड यांच्या स्मरणार्थ पाणपोई उभारण्यात आली, याचे उद्घाटन आ. यावेळी कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यात्रा कमिटीचे वतीने तसेच करमाळा पोलीस स्टेशन यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता या बंदोबस्तासाठी करमाळा पोलीस स्टेशनची पीएसआय माहुलकर साहेब, ढवळे साहेब व त्यांची टीम उपस्थित होते.