कर्जत-करमाळा रिव्होल्युशन फोटोग्राफर युनियनच्या अध्यक्षपदी श्री.डाळिंबे तर उपाध्यक्षपदी श्री.मांडगे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कर्जत-करमाळा रिव्होल्युशन फोटोग्राफर युनियनच्या अध्यक्षपदी आर्या फोटोग्राफीचे संचालक सागर डाळींबे तर उपाध्यक्षपदी महेंद्र आर्ट चे संचालक महेंद्र मांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कर्जत व करमाळा या दोन्ही तालुक्यातील छायाचित्रकारांच्या व्यवसाय, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरणासाठी ही संस्था काम करणार आहे. कर्जत येथील हॉटेल केशर व्हेज या ठिकाणी २१ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता एस. आर. के. लॅब मुंबई व केकेआर फोटोग्राफर युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने छायाचित्रकारांसाठी अल्बम डेमो चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच बरोबर कार्यकारणी निवडी साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष त्याच बरोबर माऊली जाधव, राज झिंजाडे, सचिन पोटे, शहाजी गोरे, दत्तात्रय ससाणे, संपत नेवसे, सुमित भैलुमे, संदीप साळवे, दादा पवार यांची सर्वानुमते बिनविरोध संचालक पदी निवड करण्यात आली. एस आर के लॅब ऑल इंडिया मार्केटिंग हेड प्रदीप शहा यांनी अल्बम व फोटोग्राफी क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नितीन कोल्हे, दत्ता ससाने, भाऊसाहेब गायकवाड, सचिन पोटे आदींनी मनोगत व्यक्त करून नवीन कार्यकारिणी ला शुभेच्छा दिल्या.
यावेळी आण्णा बागल, भरत तुपे, राजेंद्र तोरडमल, महेंद्र पठाडे, अक्षय फरताडे, सागर पवार, कृष्णा जरांगे, तुकाराम सायकर, अशोक सुद्रिक, अशोक बावडकर, उमेश रासने, अमोल खरपुडे, काका गोरे, नितीन काळे, विकास डाडर, अर्शद शेख, अशोक कदम, संतोष मेंगडे, महेंद्र ऊघडे, अमर शिरसाठ, मंगेश गारुडकर, गणेश नलगे, गणेश चव्हाण, शंकर विळे आदीसह दोन्ही तालुक्यातील छायाचित्रकार उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचे आभार शिरीष यादव यांनी मानले.