करमाळ्यातील बंद घरात चोरी – 60 हजारांचा माल लंपास..!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील बायपास रोडलगत असलेल्या अपार्टमेंटमधील एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ३२ हजार रुपयांचे साडेआठ ग्रॅमचे दागिने व २८ हजार रुपयांची रोख रक्कम असा ६० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
हा प्रकार २४ एप्रिलला मध्यरात्री घडला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात सौदागर तरंगे (रा.भालेवाडी ता.करमाळा) यांनी तक्रार दिली आहे. ते सध्या फुलारीमळा येथे (घोलप अपार्टमेंट, करमाळा) येथे राहत आहेत. यात हकीकत अशी कि, गेल्या काही दिवसांपासून घराचा बंद दरवाजा पाहिल्यानंतर त्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी नजर ठेवून २४ एप्रिलच्या मध्यरात्री या घराच्या आत जावून ही चोरी केली. यामध्ये अर्धा तोळ्याचे अंगठी व साडेतीन ग्रॅमचे कानातील फुले असे एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल व घरात ठेवलेली २८ हजाराची रोख रक्कम असे घेवून गेले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्रीकांत हराळे हे करीत आहेत.