घोटी येथे जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई - २७०० रू. ची रोकड जप्त.. -

घोटी येथे जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई – २७०० रू. ची रोकड जप्त..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : वरकुटे ते घोटी रस्त्यालगत हॉटेल जगदंबाच्या शेजारी चिंचेच्या झाडाखाली पत्त्याचा डाव खेळणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून २७०० रूपये व पत्त्याचा डाव जप्त केला आहे. हा प्रकार ६ मे ला दुपारी साडेतीन वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक रज्जाक काझी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की घोटी येथे काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर मी तसेच पोलीस नाईक ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे असे आम्ही तेथे खासगी वाहनाने गेलो असता, तेथे जालिंदर गोरख राऊत, दादा नाथा थोरात, दिलीप देवराव थोरात, गोरख प्रभाकर राऊत (सर्व रा.घोटी), परमेश्वर दशरथ बेडकुते (वरकुटे) हे सर्वजण मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून २७०० रूपये रोख व पत्त्याचा डाव जप्त केला आहे. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!