२५ मे रोजी उत्तरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव ) – केम (ता.करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर शिवलिंग प्राणतिष्ठापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
येत्या गुरूवारी २५ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत येथील छबिन्याच्या मार्गावरून महिला भाविकांची जलकुंभ शोभायात्रा सोहळा ६ ते ११:३० या वेळेत श्री ऊत्तरेश्वर शिवलिंगाची पुनः प्राणतिष्ठापना व लघु रूद्राभिषेक व पूजन दुपारी १:३० वा. पासून महाप्रसाद सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ह.भ.प. डॉ. किरण बोधले महाराज यांचे कीर्तन तरी या धार्मिक कार्यक्रमाचा केम व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने करण्यात आले आहे.
या निमित्त मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे केम येथे प्रथमच हा सोहळा होत असल्याने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.