जिंती जवळील जीप व कार अपघातात १ ठार तर ८ जण जखमी.. - Saptahik Sandesh

जिंती जवळील जीप व कार अपघातात १ ठार तर ८ जण जखमी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.22) : जिंती (ता.करमाळा) येथील चौकात जीप व कार चा अपघात होवून एकजण ठार तर आठजण जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर असल्याची माहिती आहे. यातील काही जखमींना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना भिगवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यात हकीकत अशी कि, पुणे येथून विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील सौंदे याठिकाणी जाण्यासाठी क्रूझर (जीप) क्रमांक MH.13.BN.2518 ही गाडी येत असताना जिंती चौकात एका कार गाडी सोबत अपघात होवून या अपघातात सीताबाई अभिमान जगताप (वय ५५) ही महिला जागीच ठार झाली असून महादेव सुखदेव जगताप (वय ५५, रा. सौंदे) हे गंभीर जखमी आहेत. यामध्ये क्रूझर (जीप) चे चालक शुक्रेश्वर खंडागळे (रा.गुळसडी) तसेच पुष्पा प्रभाकर जगताप, चंद्रभागा नारायण वीर, छाया प्रभाकर जगताप, गोदावरी कांतीलाल जगताप, सुनिता महादेव जगताप व मधुराणी जगन्नाथ जगताप (सर्व रा. सौंदे, ता. करमाळा) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. याप्रसंगी अनेकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!