जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोर्टीतील छ. शिवाजी हायस्कूलचा संघ प्रथम
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – २५ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोर्टी (ता.करमाळा) येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून त्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
कोर्टी हायस्कूलने कबड्डीमध्ये उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये कोर्टी हायस्कूल, करमाळा विरुद्ध मंगळवेढा असा अंतिम सामना रंगला होता. कोर्टी (करमाळा) संघाने मंगळवेढा संघावर २९ गुणांनी चढाई करत एकतर्फी सामना जिंकला. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे आहेत सपना मासाळ (कर्णधार), प्रज्ञा आदलिंगे, साक्षी गोरे, प्रगती वायदंडे, ऐश्वर्या गोरे, साक्षी देवकाते, मयुरी गोरे, ज्ञानेश्वरी अभंग, नम्रता हुलगे, नेहा जाधव, सृष्टी साळवे, वर्षा चोरमले, इ. विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेऊन कोर्टी हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला आहे. या खेळाडूंना संघाचे मार्गदर्शक श्री. बाळसाहेब भिसे, प्रशिक्षक श्री. नवनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापिका श्रीम. ज्योती चव्हाण, सर्व शिक्षक स्टाफ यांनी अथक विद्यार्थ्यांच्या खेळासाठी अथक परिश्रम घेतले. संथेचे चेअरमन डॉ. महेश अभंग व सर्व ग्रामस्थ कोर्टी यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.