केम महसूल मंडळमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे - नागरिकांची मागणी - Saptahik Sandesh

केम महसूल मंडळमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे – नागरिकांची मागणी

संग्रहित छायाचित्र

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – केम महसूल मंडळात पूर्वी पर्जन्य माफक यंत्र बसविले होते. त्यामुळे पावसाची नोंद वेळच्या वेळी केली जात होती परंतू गेल्या वर्षी केम येथे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती, या पावसात हे पर्जन्य माफक यंत्र वाहून गेले त्यानंतर नवीन पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे पावसाची नोंद कशी घेणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

केम येथे या नळकांडामध्ये ठिकाणी पूर्वी पर्जन्यमापक यंत्र होते जे अतिवृष्टीमुळे वाहून गेले

केम महसूल मंडळात एकूण दहा ते बारा गावे आहेत. तसेच या वर्षी पावसाळ्यात सुरवातीला ३ महिने पाऊस फारच कमी प्रमाणात पडला. त्याची नोंद घेता आली नाही. आता परतीचा पाऊस या दोन ते तीन दिवसात पडायला सुरुवात झाली. परवा केम येथे जोरदार पाउस झाला पण पर्जन्य मापक यंत्र नसल्याने याची नोंद कशी होणार? अंदाजे तरी किती पाऊस पडला हे कसे ठरवणार? यावर पिक पाण्याची नोंद ठरवली जाते या वर शासनाची मदत मिळते तरी या महसूल मंडळात त्वरित पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या बाबत गावकामगार तलाठी आदलिंगे यांच्या कडे विचारणा केली असता पर्जन्य माफक यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी लवकर सादर केला जाईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!