जेऊर येथे ‘आम्ही वृक्षप्रेमी’ या व्हॉटस ॲप ग्रूपच्यामाध्यमातून 167 झाडांची लागवड…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील ‘मुक्ता इंटरप्रायझेस’चे सचिन पवार यांनी “आम्ही वृक्षप्रेमी” व्हॉटस ग्रूपच्या माध्यमातून झाडे लावण्याचे आयोजन केले त्यानुसार याच ग्रूपच्या माध्यमातून वृक्षारोपण ही एक चळवळ तयार होऊन सुमारे 167 झाडांची लागवड होऊन 148 झाडे सध्या दिमाखात उभी आहेत. सध्या या सर्व झाडांची निगा राखण्याचे उत्कृष्ट काम करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे व ग्रामसेवक कुदळे यांनी मोटार देवुन पाण्याची सोय केली असून, सुहास गायकवाड यांनी करमाळा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या सहकार्यानेही वृक्षारोपण केले आहे.
जून 2018 साली भारत हायस्कूल जेऊर च्या सन 1994 च्या दहावी बॅच च्या मुलांनी एकत्रित येत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने भारत मंजुळे याने कल्पना मांडली आणि मधुकर बांदल, सुहास डांगे, महावीर मंडलेचा,विवेक लबडे, सुनील तोरमल, भालचंद्र निमगिरे यांनी हिरीरीने सहभाग घेतला. याला दहावी 1998 बॅच च्या मुलांनी अर्थ सहाय्य सहभाग घेतला. यामध्ये संतोष नुसते, दिलीप निमगिरे, तुषार पिसे इ.सहभाग होता. त्यांचा ऑस्ट्रेलियातील मित्र वृक्षप्रेमी हनुमंत जगताप यांनी भरघोस आर्थिक मदत दिलीच शिवाय त्यांच्या छोट्या भावाला, गणेश ला पाण्याचा टँकर ने पाणी देण्यास सांगितले. या सर्व प्रक्रियेत जेऊर मधील अनेक मान्यवरांनी देखील आर्थिक हातभारासह मार्गदर्शन केले. यामध्ये माजी आमदार नारायण पाटील, डॉ.सुभाष सुराणा, प्रा.अरविंद दळवी, डॉ.देशपांडे, जनता बँक, शांताराम सुतार, पंडित, नागेश झांझुर्णे, संदीप कोठारी, दिनेश देशपांडे, कल्याण साळुंखे, राजेंद्र जाधव, सूर्यकांत मोहिते कुलकर्णी गुरुजी ,शरद आरकिले इ.खूप मान्यवरांचे सहकार्य लाभले.