श्रीदेवीचामाळ येथे १९ पासून कमलाई फेस्टिव्हल - रांगोळी व डान्स स्पर्धांचे आयोजन - Saptahik Sandesh

श्रीदेवीचामाळ येथे १९ पासून कमलाई फेस्टिव्हल – रांगोळी व डान्स स्पर्धांचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान श्रीदेवीचामाळ (करमाळा) येथील राजेरावरंभा तरुण मंडळद्वारे कमलाई फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या फेस्टिवलचे आयोजनाचे हे १७ वे वर्ष आहे.

या फेस्टिवल मध्ये रांगोळी स्पर्धा व डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धांचे नियोजन पुढील प्रमाणे आहे.

  • १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ दरम्यान रांगोळी स्पर्धा (खुला गट)  आयोजित केलेली आहे. यात पहिले बक्षीस १५००, दुसरे बक्षीस ११०० व तिसरे बक्षीस ७०० रुपये देण्यात येणार आहे.
  • २० ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० दरम्यान डान्स स्पर्धा (५ ते १२ वयोगट). यात पहिले बक्षीस ५५५५ रुपये, दुसरे बक्षीस ३३३३ व तिसरे बक्षीस २२२२ रुपये देण्यात येणार आहे.
  • २१ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० दरम्यान वैयक्तिक डान्स स्पर्धा ( खुला गट वयोगट). यात पहिले बक्षीस ५५५५ रुपये, दुसरे बक्षीस ३३३३ व तिसरे बक्षीस २२२२ रुपये देण्यात येणार आहे.
  • २२ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० दरम्यान ग्रुप डान्स स्पर्धा ( खुला वयोगट). यात पहिले बक्षीस ५५५५ रुपये, दुसरे बक्षीस ३३३३ व तिसरे बक्षीस २२२२ रुपये देण्यात येणार आहे.
  • २३ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० दरम्यान बक्षीस वितरण समारंभ

या स्पर्धा ग्रामपंचायत पार्किंग, देवीचामाळ, करमाळा येथे होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी कार्यक्रम पत्रिकेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!