केम ग्रामपंचायतीमध्ये यंदा परिवर्तन होणे अटळ – जनता आमच्या पाठीशी – अच्युत तळेकर
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम ग्रामपंचायत निवडणुकीत श्री ऊत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनल सत्ताधारी मोहिते-पाटील गटाच्या विरोधात परिवर्तनासाठी पूर्ण ताकदीने उतरला असून आता केम ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन होणे अटळ आहे. जनता व मतदार आमच्या पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. असा विश्वास श्री ऊत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनल प्रमुख अच्युत तळेकर यांनी प्रचार सभेत व्यक्त केला.
श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन विकास पॅनलची प्रचार सभा उत्तरेश्वर मंदिर येथे नुकतीच पार पडली. यावेळी विविध नेत्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवकर यांनी केले.
यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा बाळासाहेब देवकर या बोलताना म्हणाल्या की, केम ग्रामपंचायत मध्ये गेली पंधरा वर्षे पासून महिला उमेदवारांना ग्रामपंचायतीमध्ये राज्य करण्याची संधी कधीच मिळाली नाही परंतु या निवडणूकित या पॅनलच्या माध्यमातून महिला म्हणून मला संधी मिळाली आहे. मला मिळालेल्या संधीतून गावच्या विकासाबरोबरच महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन. त्यामुळे मला व माझ्या पॅनलला सेवा करण्याची संधी द्यावी.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना महावीर तळेकर यांनी सत्ताधाऱ्यांना निवडून येण्याचे खुले आव्हान दिले तर वर्षा चव्हाण यांनी गावातील संपूर्ण महिला मतदारांनी युवा पॅनलच्या पाठीशी खंबीर उभा आहेत तर मारुती पारखे यांनी परिवर्तनाच्या लाटे सत्ताधारी टिकणार नाहीत. तसेच युनूस पठाण यांनी अल्पसंख्यांकांना निधी न देता फक्त आश्वासनांच्यावर अल्पसंख्याकांचा मता पुरता वापर केला. मागील निवडणुकीत सतीश खानट यांचा निसटता पराभव झाला यावेळी प्रभाग क्रमांक तीन मधले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याचे पॅनल प्रमुख तळेकर यांनी जाहीर केले.
सागर राजे दौंड यांनी परिवर्तन पॅनलचा जाहीरनामा जाहीर करीत ग्रामस्थांना घरपट्टीत 50 टक्के सवलत देऊन पूर्ण गाव सीसीटीव्ही कक्षेत आणून संभाजी चौक व येथे भव्य स्मारक व भीमनगर येथे डॉ. आंबेडकर स्मारक उभारून केम चा चेहरा मोहरा बदलणार तसेच केम गावात गेली पंधरा वर्षापासून असलेले असलेल्या पाणी ,कचरा, आरोग्य, जिल्हा परिषद शाळा, सुसज्ज बस स्थानक, रेल्वे उड्डाणपूल, पशुवैद्यकीय दवाखाना, या सुविधा पुरत बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावत केममध्ये नवीन बँक स्थापन करून या उद्योजकांना बिनव्याजी कर्जपुरवठा व अप्पर तहसील मंजूर करून सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळवून देण्याची जाहीर केले.
तर बाळासाहेब देवकर यांनी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात खते बी बियाणे आवश्यक पुरवठा करून जमिनीचा स्त्रोत वाढवून केम मधील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करून वेळ पडली तर सोसायटी मार्फत आर्थिक पुरवठा करण्याचे जाहीर केले शेतकरी व महिलांना स्वावलंबी बनवून एक आदर्श शेतकऱ्यांचे मॉडेल तयार करून जमिनीचा स्त्रोत वाढून केममधील जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणण्यासाठी प्रयत्न करून वेळ पडली तर सोसायटी मार्फत कर्ज पुरवठा करण्याचे जाहीर केले शेतकरी व महीलाना स्वावलंबी बनवून एक शेतकरी मॉडेल तयार करून शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील राहील असे जाहीर केले. तर कार्यक्रम तर आभार कार्यक्रम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर राजे तळेकर यांनी केले.
संबंधित बातम्या : मागील १५ वर्षात केलेल्या कामामुळे आमचीच सत्ता येणार – अजित तळेकर
केम ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी दुरंगी लढत