राष्ट्रीय स्पर्धेत करमाळ्यातील वैभव काळे या खेळाडूला मिळाले २ सुवर्णपदक - Saptahik Sandesh

राष्ट्रीय स्पर्धेत करमाळ्यातील वैभव काळे या खेळाडूला मिळाले २ सुवर्णपदक

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कँपाल पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत करमाळा येथील वैभव काळे या खेळाडूने पिंच्याक सिलाट या खेळात उत्कृष्ट कामगिरी दोन सुवर्णपदक व १ कांस्य पदकांची कमाई केली आहे.

वैभवने ६० ते ६५ किलो टॅंडिंग प्रकारात अंतिम सामन्यात चंदिगढच्या खेळाडुला हरवून विजेतेपद मिळविले आहे. सोलापूर जिल्हा पिंच्याक सिलाट खेळाचे प्रमुख व करमाळा येथील क्रीडाशिक्षक नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. करमाळा तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवल्याबद्दल त्याचे करमाळा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!