गुणवंताची हीच पिढी देशाचे भवितव्य घडवेल : करे-पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. १७ : आज ज्यांचे सत्कार केले हीच पिढी उद्या देशाचे भवितव्य घडवेल, असा विश्वास यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केला.
वडशिवणे येथे डॉ.भगवंत पवार यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. करे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राजेंद्र ठोंबरे हे होते.
पुढे बोलताना श्री. करे-पाटील म्हणाले, की आज माणसात देव सापडत नाही, डॉक्टरातच देव आहे, असे डॉक्टर हेच समाजाचे डोळे आहेत. त्यामुळे त्यांना फार काम करावे लागणार आहे. अशा अनेक डॉक्टरांचा सत्कार एका डॉ.भगवंत पवार यांच्या माध्यमातून होतो, ही विशेष बाब आहे. वडशिवणे गावात एवढ्या गुणवत्तेचा कार्यक्रम होणे ही विशेष बाब असून या कर्तुत्ववान युवा पिढीमुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे.
यावेळी प्रा. रामदास झोळ म्हणाले, की ज्या विद्यार्थाला करीअर घडवायचे त्यांने आपले उद्दीष्ट ठरवले पाहिजे. त्यानुसार सीईटीची तयारी केली पाहिजे. शिक्षण घेताना सर्व कागदपत्राची पुर्तता, वेळेची मर्यादा व शिष्यवृत्तीची माहिती घेतली पाहिजे. ज्याचे उत्पन्न साडेचार लाखाच्या आत आहे, त्यांना बिगरव्याजी कर्ज मिळते. त्याचा लाभ घेतला पाहिजे. पाल्य व पालक या दोघांनी निर्णय घेतलातरच पाल्य योग्य ठिकाणी पोहोचतो.
यावेळी संतसाहित्याचे अभ्यासक ॲड.डॉ.बाबूराव हिरडे, साईनाथ देवकर, प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जगदाळे यांनी केले तर सुत्रसंचलन संयोजक गणेश पवार यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. भगवंत पवार यांनी मानले.
यावेळी सी.ए. समाधान कदम, एम.बी.बी.एस. चे आदित्य लोंढे (कंदर), शुभम बरकडे (केम), धनराज दुरंदे, (राजुरी), बीडीस ची सोनम जगदाळे (वडशिवणे), बी.ए. एम. एस. चे प्रिती माने (केम), बीएचएमएस आरती पन्हाळकर, प्रिती पन्हाळकर (वडशिवणे) तसेच वैष्णवी माने, महेश फरतडे याबरोबरच पी.एस.आय. सचिन खुटाळे यांचे मान्यवरांच्या हास्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रा. विष्णू शिंदे, गोपालक परमेश्वर तळेकर तसेच उद्योजक दत्तात्रय पवार, आदर्श शेतकरी सुभाष पवार, शेखर गिरमा, विशाल जगदाळे, माजी सरपंच रत्नाकर कदम, माजी संचालक गोरख जगदाळे, प्रसाद पाठक, हनुमंत वाघमारे, जयंत वारे, हनुमंत देवकर, कारंडे, गोविंद जगदाळे, आबा कदम, बाळासाहेब वनवे, दशरथ मगर, संतोष कवडे, अमीर मणेरी, अरूण जगदाळे, सखाराम राऊत, भैरवनाथ उघडे, महावीर वाघमारे, ऋतुजा कोडलिंगे, ऋतुजा गिरमा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.