रामदास कोकरे यांना करमाळा मित्र पुरस्कार-करमाळा तालुका फ्रेंड सर्कलचा उपक्रम - Saptahik Sandesh

रामदास कोकरे यांना करमाळा मित्र पुरस्कार-करमाळा तालुका फ्रेंड सर्कलचा उपक्रम


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१५: पर्यावरण क्षेत्रात ज्यांनी करमाळ्याचे नाव महाराष्ट्रात  उज्वल केलं , ज्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून माथेरान येथील रस्त्याला रामदास कोकरे पथ म्हणून  नाव देण्यात आले,असे लातूर नगर परिषदेचे प्रशासन आयुक्त  रामदास कोकरे  यांना करमाळा तालुका फ्रेंड सर्कल च्या वतीने “करमाळा मित्र पुरस्कार” देण्यात आला आहे. हा पुरस्कार करमाळा तालुका फ्रेंड सर्कल च्या तिसर्या  स्नेहमेळाव्यात पणनचे सहसंचालक मोहन निंबाळकर , सचिन शहा, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व अधिकारी, उद्योजक उपस्थीत होते.  विशेष  म्हणजे यावेळी करमाळा तालुका फ्रेंड सर्कलच्या वतीने शालेय पोषण आहार अधिक्षक संतोष फाटके , विकास सरडे, अॅड सुहास मोरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थींनीना 14 सायकलीचे  वाटप करण्यात आले.  या फ्रेंड सर्कल च्या वतीने . एवरेस्ट सर केलेले पुणे येथील ए.पी.आय. शिवाजीराव  ननावरे  यांचाही सत्कार करण्यात आला. मागील वर्षी mpsc आणि upsc मध्ये यशस्वी झालेल्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी सूत्र संचालन नितिन आढाव यांनी केले. तर संयोजन आयुक्त संतोष लोंढे , पोलिस निरिक्षक सचिन वांगडे, उपजिल्हाधकारी रामहरी भोसले , राजेंद्र वारगड  आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!