पोंधवडी येथील सुखदेव क्षिरसागर यांच्यावर खुनीहल्ला

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पोंधवडी येथील सुखदेव बाबा क्षिरसागर (76) यांच्यावर मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींनी खुनी हल्ला केला आहे. काल (ता.15) सायंकाळी जेवण करून सुखदेव बाबा क्षिरसागर हे त्यांच्या वस्तीसमोर लाकडी बाज़ेवर एक़टे झोपले होते. दारात वीजेचा बल्ब लावलेला होता. मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तीने प्रथम विजपुरववठा खंडित करुन, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने उसतोड़ कोयत्याने डोक्यावर व तोंडावर वार केले आहेत.
सुखदेव क्षिरसागर हे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांचे एक बोट सुध्दा तुटले आहे. डोक्याला कोयत्याचा जबर मार लागला आहे. हल्ला केल्यावर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हा हल्ला झाल्यानंतर श्री. क्षिरसागर हे मोठ्याने ओरडले. त्यानंतर नातेवाईक उठले. त्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी करमाळा येथे आणले. ही बाब तात्काळ पोलीसांना कळवली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


