उजनीच्या पाण्यासंदर्भात आढावा घेऊन धरणग्रस्तांच्या मागणीचा विचार करू - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - Saptahik Sandesh

उजनीच्या पाण्यासंदर्भात आढावा घेऊन धरणग्रस्तांच्या मागणीचा विचार करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून जलाशयाच्या काठावरील शेतकरी उद्या भिगवण येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी आज (दि.३१) मुंबईत समक्ष सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची यांची मुंबईत समक्ष भेट घेऊन खालील मागण्यांसाठी निवेदन दिले.

  • उजनीच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील 19 धरणातून १० टीएमसी पाणी उजनी जलाशयात सोडावे
  • उजनीच्या खाली भागात कॅनॉलमधून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन बंद करावे
  • सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे.
  • कालवा सल्लागार समितीत तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांचे प्रतिनिधी घ्यावेत

या निवेदनानंतर, पुढील आठवडय़ात सोलापूरात उजनीच्या पाण्यासंदर्भात शासकीय अधिकारी व संघर्ष समिती यांची बैठक लावून आढावा घेऊ व धरणग्रस्तांच्या मागणीचा विचार करू असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.३१) मुंबईत दिले अशी माहिती श्री.बंडगर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!