मूकबधिर शाळेतील मुलांसोबत शिवार्थने केला वाढदिवस साजरा

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कुंभेज (ता.करमाळा) येथील शिवार्थ अमोल मुटके याचा ३ मार्च रोजी असणारा वाढदिवस देविचामाळ येथील मूकबधिर मुलांच्या शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत केक कटिंग करण्यात आले.तसेच वाढदिवसा निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले.

या प्रसंगी विदर्भ कोकण बँकेचे गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल,माजी सरपंच दादासाहेब चौगुले, चेअरमन युवराज भोसले ,ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेज चे मालक कुमार कादगे,नवनाथ तोरमल, सतीश भोसले, विद्यालयाचे सह शिक्षक परबत सर आदीजन उपस्थित होते.

