वरकटणे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचे भूमिपूजन… - Saptahik Sandesh

वरकटणे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचे भूमिपूजन…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : हर घर जल योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम प्रगतीपथावर असून, वरकटणे (ता.करमाळा) येथे यापूर्वी विहिरीच्या कामास अडचण आल्यामुळे विलंब झाला होता. या अडचणीवरती मात करून आज (ता.५) वरकटणे येथे आ.संजयमामा शिंदे गटाचे तानाजी बापू झोळ, विलास दादा पाटील, सुजित तात्या बागल या मान्यवरांचे हस्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत विहिरीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

याप्रसंगी तानाजी बापु झोळ, चंद्रकांत काका सरडे, विलास दादा पाटील, सुजित तात्या बागल, दत्ता अडसूळ ,मानसिंग खंडागळे, रविन्द्र वळेकर, आप्पा आरणे तसेच वरकटणे गावातील आ .स. सा. का, माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर, सोसायटीचे चेअरमन शरद देवकर सर तंटामुक्ति अध्यक्ष आण्णासाहेब देवकर, माजी ग्रा पं सदस्य विश्वभंर देवकर, रमेश पाटील, संतोष देवकर ,माजी शाळा व्यवस्थापन समिती

अध्यक्ष हनुमंत पाटील, ग्रा पं सदस्य आबासाहेब सुतार, ग्रा पं सदस्य पांडुरंग पवार, ग्रा पं सदस्य नवनाथ देवकर, माजी ग्रा पं सदस्य आप्पा टांगडे, प्रीतम देवकर ,समाधान मस्कर, सुनील सुतार ,गोकुळदास तनपुरे, माजी सरपंच सतीश तनपुरे, ग्रा पं सदस्य किरण पाटील,बिबीशन देवकर माजी ग्रा,पं सदस्य,बबन पाटील तसेच वरकटणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी मस्कर यांनी केले तर आभार सुदामभाऊ मस्कर यांनी मानले. याप्रसंगी सुजित तात्या बागल व तानाजी मस्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!