अमरजित साळुंखे यांनी भाजपाला दिला राजीनामा -

अमरजित साळुंखे यांनी भाजपाला दिला राजीनामा

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील त्यांचे समर्थक व अमरजित साळुंखे यांनी भाजपच्या करमाळा तालुका भाजप सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे त्यांनी सदस्य व पदाचा राजीनामा दिला आहे.

साळुंखे हे मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत. रविवारी (दि.१४ एप्रिल) धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी लगेच आपल्या भाजप पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला व मोहिते पाटील यांच्या बरोबर तुतारी हातात घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. धैर्यशील मोहिते- पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!