मोटारसायकलची चौकशी केल्याने तरूणास मारहाण.. - Saptahik Sandesh

मोटारसायकलची चौकशी केल्याने तरूणास मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माझी मोटारसायकलची चावी तू घेतलीस काय.. तु असे म्हटल्याने दुसऱ्या तरूणाने त्यास लाकडी काठीने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार म्हसेवाडी (ता. करमाळा) येथे १ एप्रिलला सायंकाळी साडेसात वाजता घडला आहे.

या प्रकरणी ११ एप्रिलला करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. यात अमोल रामा हंडाळ (रा. म्हसेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या मोटारसायकलची चावी हरवल्याने मी प्रदीप शेषाप्पा ननवरे ( रा. म्हसेवाडी) यास माझ्या गाडीची चावी तुझ्याकडे आहे का.. असे म्हटले असता त्याने शिवीगाळ करून खाली पडलेली काठी उचलून मला बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!