करमाळा नगरपालिकेचे १ लाख २६ हजार रूपयाच्या पाईपची चोरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा नगरपरिषदेच्या पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी आवश्यक असणारा दहिगाव येथून एचडीपीई असे ७० मीटर लांबीचे पाच पाईप चोरीला गेले आहेत.
या प्रकरणी नगरपरिषदेचे कर्मचारी फिरोज वजीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दहिगाव येथून करमाळा नगरपालिकेचे १ लाख २६ हजार रूपये किंमतीचे ७० मीटर लांबीचे एचडीपीइचे पाच पाईप ४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीला गेले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.