जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न - Saptahik Sandesh

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी : सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना, आठवले गट, मनसे, राष्ट्रीय समाज पार्टी यांच्यासह इतर घटक पक्षाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या नियोजनसंदर्भात सावली बांगला मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा क्षेत्रातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील सर्व युवक पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सर्व युवक पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून आण्यासाठी निर्धार केला.

घरोघरी जाऊन, कॉर्नर सभा घेऊन राष्ट्रवादी युवक संघटना जोरदार प्रचार करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सांगितले. याप्रसंगी सोलापूरचे माजी नगरसेवक बिजू आण्णा प्रधाने, जेष्ठ नेते मानाजी बाप्पू माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, सोलापूर शहराध्यक्ष सुहास कदम, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक मुलाणी, जिल्हा उपाध्यक्ष जुबेर फुलारी, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय शिंदे , जिल्हा सरचिटणीस सारंग महामुनी, पंढरपूर शहराध्यक्ष अमोल परबतराव, कार्याध्यक्ष शुभम पवार, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष बसवराज कोरे, तालुका उपाध्यक्ष तुषार म्हमाणे, बसवराज मुडवे, मैंदर्गी शहराध्यक्ष किरण लोणी, उत्तरचे युवक नेते नंदकुमार गरड, माथाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप ननवरे, बाबा मोटे, आण्णा शिरसाठ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कार्यकारणीवरील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!