सेवानिवृत्त अभियंता प्रकाश कोळेकर यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधि
करमाळा,ता.25: येथील
सेवानिवृत्त अभियंता प्रकाश कोळेकर यांचे निधन झाले आहे.गेल्या काही महिन्यापासून ते आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचारी करण्यात आले होते ,परंतु उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले आहे .
आज (ता.25) सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या गावी खांबेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्वांनाच धक्का बसला असून एक अतिशय मनमिळावू व दिलदार अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केले .तसेच सेवानिवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यातील सहभागी होते.त्यांच्या या जाण्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्यामागे पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे.