मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात विविध सभा संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा निवडणूकीच्या प्रचारार्थ दिनांक 22 एप्रिल रोजी कार्यकर्त्यांसह करमाळा तालुका दौरा पार पडला.
२२ एप्रिलला सकाळी उमरड येथे सभा झाली. त्यानंतर सकाळी १० वाजता वाशिंबे येथे दुसरी सभा झाली. दुपारी १२ वाजता सोगाव पश्चिम येथे कॉर्नर बैठ, दुपारी १:३० वाजता मांजरगाव येथे कॉर्नर बैठक, दुपारी सव्वा दोन वाजता पोफळज येथे कॉर्नर बैठक, ३ वाजता कुंभेज येथे कॉर्नर बैठक, पावणेचार वाजता कोंढेज येथे कॉर्नर बैठक पार पडली. दुपारी सव्वाचार वाजता साडे येथे सभा झाली. सायंकाळी ६ वाजता वांगी १ येथे व रात्री ८ वाजता चिखलठाण येथे देखील सभा झाली.

यावेळी उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बरोबर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले, देवानंद बागल, भरत शिंदे, अतुल पाटील,अमरजित साळुंखे, अँड.सविता शिंदे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या करमाळ्यासह सहा ठिकाणी सभा होणार आहे.२४ एप्रिलला मोडनिंब येथे एक सभा झाली असून, दि. 26 एप्रिल रोजी करमाळा येथे सकाळी दहा वाजता मार्केट कमिटी समोरील ग्राउंड सभा होणार आहे. तसेच त्याच दिवशी तिसरी सभा 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता सांगोला येथे , चौथी सभा 27 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दहिवडी येथे, पाचवी सभा 30 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फलटण येथे तर सहावी सभा दोन मे रोजी अकलूज येथे सकाळी १० वाजता होणार आहे. या सभेतून शरद पवार आपल्या भाषणातुन काय सांगणार आहेत याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.



