केम येथील शिबिरात २०१ जणांचे रक्तदान तर २२५ जणांची नेत्र तपासणी

केम (संजय जाधव) – शिवशंभू पाईक व श्री छत्रपती संभाजी राज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संभाजीराजे उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण २०१ रक्तदात्यानी रक्तदान केले तर एकूण २२५ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी केली. रक्त संकलन करण्याचे काम सोलापूर येथील मेडिकेअर ब्लड बॅंक यांनी केले तर नेत्र तपासणी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. समीर तळेकर व दत्ता तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.
या शिबिराचे उदघाटन ह.भ.प.सुरेश महाराज थिटे यांच्या हस्ते राजे छत्रपती संभाजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी थिटे महाराज म्हणाले आज राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे रक्ताची गरज आहे आपल्या रक्तादानामुळे अनेकांचे प्राण वाचतात रक्तदानासारखे दान जगात दुसरे कोणतेही नाहि रक्तदान हे श्रेष्ट दान आहे त्यामुळे अस्या शिबिरात प्रत्येकानी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहान त्यांनी या प्रसंगी केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याना पिण्याच्या पाण्याचा हजार मोफत वाटला या वेळी राजे संभाजी महाराज उत्सव समिती सदस्य व केम ग्रामस्थ उपस्थित होते. या मंडळाच्या उपक्रमाचे केम व परिसरातून कौतूक केले जात आहे.

या शिबिरात येथील शिवाजी तळेकर व रेणूका तळेकर या जोडप्याचा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी रक्तदान केले. त्यानंतर राजे संभाजी महाराज ऊत्सव समितीच्या वतीने त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.



