पत्रकारांना पोलिस ठाण्यात मिटींगच्या निमित्ताने बोलावून अपमानास्पद वागणूक; करमाळा पत्रकार संघाने नोंदविला निषेध - Saptahik Sandesh

पत्रकारांना पोलिस ठाण्यात मिटींगच्या निमित्ताने बोलावून अपमानास्पद वागणूक; करमाळा पत्रकार संघाने नोंदविला निषेध

करमाळा : करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या निरोपानंतर करमाळा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक केबिनमध्ये बसलेल्या अनोळखी व्यक्तीने एका ज्येष्ठ पत्रकाराला अपमानास्पद वागणूक दिल्याने करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पत्रकारांच्या व्हॉट्स अप ग्रुप वर बुधवारी सायंकाळी करमाळा पोलिस निरीक्षक यांच्या वतीने मीटिंग साठी निरोप आल्यानंतर गुरुवार दि. १६ रोजी सकाळी अकरा वाजता सर्व पत्रकार पोलीस निरीक्षक केबिन बाहेर जमले होते. यावेळी येथे कोणताही पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने एका जेष्ठ पत्रकाराने केबिनचा दरवाजा उघडून आत डोकावले असता तिथे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्याऐवजी दूसरीच व्यक्ती बसलेली आढळली. या व्यक्तीने दरवाजा उघडल्याबद्द्ल त्या जेष्ठ पत्रकाराला खडसावून ती व्यक्ती सेवानिवृत्त डिवायएसपी असल्याचे सांगत फॅन चालू करण्यास सांगितले. या उपरही बाहेरून आलेल्या एका कर्मचाऱ्यानेही उपस्थित पत्रकारांना केबिन जवळ का गर्दी केली आहे. साहेब आत नाहीत, बाहेर जावा असा एकेरी उल्लेख करत अपमानास्पद वागणूक दिली आहे.

यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन करमाळा तालुका पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर यांनी झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध करून यापुढे पोलिस स्टेशनच्या कोणत्याही मिटींगला उपस्थित न राहण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!