अविनाश सरडे यांची महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कारासाठी निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – चिखलठाण नं. २ (ता. करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी अविनाश मारूती सरडे यांची महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार २०२४ साठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र केळी उत्पादक संघाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष किरण (भाऊ) चव्हाण व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अतुल माने-पाटील यांनी केले आहे.
श्री. सरडे यांची चिखलठाण नं. २ येथे शेती आहे. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केले व शेतीमध्ये पारंपारिक शेती न करता आधुनिक पध्दतीने शेती करून युवकांपुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. केळी क्षेत्रात त्यांनी मोठ्या कष्टाने वाटचाल केली आहे. ही वाटचाल करताना त्यांनी संकटे व आव्हाने, प्रतिकुल परिस्थितीशी सामना केला आहे. ना उमेद न होता कल्पकता, जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी मात करून केळी क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरल्याने केळी उत्पादक संघ यांनी त्यांची महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार २०२४ साठी निवड केली आहे. याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार ३१ मे २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता श्री सद्गुरू सांस्कृतिक भवन कंदर येथे वितरीत करण्यात येणार आहे.