प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात टॅंकरने पाणी - नागरिकांमध्ये समाधान - Saptahik Sandesh

प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात टॅंकरने पाणी – नागरिकांमध्ये समाधान

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, सध्या भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरण्याची गरज भासत आहे, तालुक्यात सध्या ४३ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातही नियमित पाणी येत नसल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. परंतु प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनने मागेल त्याला पाणी मोहीम सुरू केली असून, टँकर भरण्यासाठी फिलिंग पॉइंट जवळ उपलब्ध नसतानाही ३० किमी दूर वरुन पाणी आणून लोकांची तहान भागवत आहेत त्यामुळे सध्या प्रा.रामदास झोळ फाउंडेशनचे सध्या कौतुक होत आहे.

सध्या तालुक्यात गावोगावी पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा यांच्या वतीने टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसाच तुटवडा हा शहरातील असल्याचे दिसून येत आहे, दुबार पंपिंग करून करमाळा शहरापर्यंत पाणी पोहोचवण्यात नगरपरिषदेला यश येत नाही. तर वारंवार बिघाड होत आहे शिवाय वीज पुरवठा अखंडित मिळत नसल्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.

हीच पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने मागील आठ ते दहा दिवसांपासून टँकरने पाणी देण्यास सुरुवात केली असून, सध्या दररोज टॅंकरने पाणी सुरु आहे, तालुक्यातील बऱ्याच व शहरातील बऱ्याच भागात टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. वाशिंबे येथून टँकर भरून तालुक्यात टँकरने पाणी द्यावे लागत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. शहरात लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा कमी झाला आहे. त्यातही कमी दाबाने पाणी येत असल्याने पिण्याचे पाणी मिळण्याची पंचायत झाली आहे.प्रा.रामदास झोळ फाउंडेशन यांच्या वतीने संबंधिताना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर ज्या ठिकाणी पाणी टाकी ठेवण्याची गरज आहे अशा रंभापुरा, मौलालीमाळ व काही भागात पाण्याच्या टाक्या ठेवण्याचे नियोजन झोळ फाउंडेशनच्यावतीने केले जात आहे. एकंदरीतच प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने चांगले काम सुरु असून, नागरिकांमध्ये पाण्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!