डॉ.आंबेडकरांचा फोटो फाडून अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - गणेश चिवटे -

डॉ.आंबेडकरांचा फोटो फाडून अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – गणेश चिवटे

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून घटनाकार महामानवांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील ज्या चवदार तळ्यावर आंदोलन करून वंचित,दुर्लक्षित,दीनदलित समाजाला न्याय मिळवून दिला अशा त्याच पवित्र ठिकाणी जितेंद्र आव्हाड याने जाणीवपूर्वक त्यांचा अवमान केला आहे.भारत देशाची लोकशाही घडवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठं आहे याचा विसर स्वतःला लोकप्रतिनिधी, आमदार म्हणवून घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना पडला आहे, त्यामुळे अशा प्रकारचे दुष्ककृत्य करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे.अशा विकृत माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच घटनेच्या संविधानिक पदावर राहण्याचा त्याला कोणताही अधिकार नसून त्यांची आमदारकी त्वरित रद्द करावी अशी मागणी सदर निवेदनात केली आहे, यावेळी भारत माता की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जितूद्दीन आव्हाड च करायच काय खाली मुंडके वर पाय आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून काढला होता.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर , ज्येष्ठ नेते संजयआण्णा घोरपडे, सोमनाथ घाडगे, दादासाहेब देवकर, सचिन चव्हाण, वैभव आहेर, लखन शिंदे, भैय्या गोसावी, प्रवीण शेळके, सचिन कानगुडे, चंद्रकांत शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, विठ्ठलभाऊ शिंदे, विष्णू रणदिवे, कमलेश दळवी, पूजा माने, जयंत काळे पाटील, रविकिरण माळवे, कपिल मंडलिक, संजय जमदाडे, प्रकाश ननवरे , नाना अनारसे, प्रसाद गेंड, गणेश गोसावी, शरद कोकीळ, विवेक अवसरे, नितीन निकम, गणेश महाडिक, गणेश माने ,चांगदेव जानकर, अशोक सातपुते, भरत गुंड, हनुमंत बरडे, विनोद इंदलकर, संतोष जवकर , यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!