साहेबराव दुर्गुळे यांच्यावर अंत्यसंस्कार - कन्या सुजता हिने दिला अग्नी.. - Saptahik Sandesh

साहेबराव दुर्गुळे यांच्यावर अंत्यसंस्कार – कन्या सुजता हिने दिला अग्नी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा, ता.३० : करमाळा येथील न्यायालयातील वकीलांचे ज्येष्ठ क्लार्क साहेबराव दुर्गुळे यांच्यावर आज (ता.३०) सकाळी १०-३० वाजता त्यांच्या मुळगावी रोशेवाडी (ता.करमाळा) येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची दुसऱ्या क्रमांकाची कन्या सुजाता चोरमले हिने त्यांना अग्नी दिला आहे.

साहेबराव दुर्गुळे (वय ६२) हे काल (ता.२९) सपत्नीक कुंभेज येथे नातेवाईकाकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून ते करमाळ्याडे निघाले असता, त्यांचा रात्री ८-३० वाजता कुंभेज फाट्याच्या पुढे करमाळ्याकडे येताना त्यांची मोटारसायकल घसरून पडली. त्या झालेल्या अपघात त्यांच्या डोक्याला मार लागला व त्यात ते जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी कल्पना या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर साहेबराव यांना रात्री उपजिल्हा रूग्णालयात पोस्टमार्टेम करण्यासाठी आणले होते.

त्यानंतर सकाळी पोस्टमार्टेम झाल्यानंतर त्यांचे पार्थीव ९-३० वाजता नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ते पार्थीव त्यांच्या मूळगावी रोशेवाडी येथे नेण्यात आले. त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची मुलगी सुजता चोरमले हिने मुलाची सर्व जबाबदारी पार पाडली, मुखअग्नी दिला तसेच चितेभोवती फेऱ्यासुध्दा मारल्या आहेत. यावेळी माजी मुख्याध्यापक एन.डी. सुरवसे, तेजस ढेरे व ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांनी यावेळी श्रध्दांजली वाहिली. यावेळी वकीलसंघाचे सदस्य, वकीलांचे क्लार्क, रोशेवाडी ग्रामस्थ तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!