केतूर मध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – केतूर क्र. २ (तालुका करमाळा) या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला व मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
यावेळी केतुर गावचे माजी सरपंच उदयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य शहाजी बापू पाटील, सचिन राऊत, राजू खटके, निवास दादा उगले, बंडू पाटील, अजित विघ्ने, संतोष डहाळे, हनुमंत राऊत, रामभाऊ कानतोडे, दिपालीताई ढेरे, सतीश आबा खाटमोडे पाटील, राजू कोकणे, सुरज राऊत, शिवाजी देवकते गुरुजी असे केतुर मधील ज्येष्ठ नागरिक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते


