बी बियाण्याच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवरती कारवाई करू – तहसीलदार ठोकडे
केम (संजय जाधव) – बी बियाण्याच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवरती कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज (दि.१०) करमाळा तहसील कार्यालयात दिले.
सध्या करमाळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने बी बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी पडलेली आहे याचा फायदा घेत दुकानदार बियाण्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने बी बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट चालवली आहे ही शेतकऱ्यांची लूट थांबवावी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदन देताना बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, प्रहार चे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर बापू तळेकर नेते नामदेव पालवे प्रहार संघटक सुनील बंडगर किरण उलटे श्रीकांत मारकड आदि जण उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवरती शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांचे होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा बहुजन संघर्ष सेना तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली. यावेळी तहसीलदार ठोकळे यांनी निवेदन स्वीकारले व बी बियाणे विक्री करणाऱ्या सर्व दुकानदारांची व कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मूळ किमतीपेक्षा जादा दराने बी बियाणे विकू नये अशी सक्त ताकीत देण्यात येईल व ज्यादा दराने विक्री करणाऱ्या बी बियाण्याच्या दुकानदारावरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे भरारी पथक नेमण्याचे आश्वासन दिले भरारी पथकाला मूळ किमतीपेक्षा जादा दराने बियाणे विकताना दुकानदार सापडल्यास त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले