'अथर्व', 'चैतन्य' व 'अभयसिंह' या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार.. - Saptahik Sandesh

‘अथर्व’, ‘चैतन्य’ व ‘अभयसिंह’ या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ‘नीट’ या वैद्यकीय पात्रता पूर्व परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या करमाळ्यातील अथर्व अनिल क्षिरसागर , चैतन्य मंगेश तरकसे , अभयसिंह भरत सरडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

‘नीट’ च्या परीक्षेमध्ये 720 गुणांपैकी श्री क्षीरसागर यांना 696 तरकसे यांना 680 व सरडे यांना 614 गुण मिळाले आहेत.याप्रसंगी करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष दीपक मोहोळ ,करमाळा बाजार समितीचे संचालक महादेव कामटे ,जनार्दन नलवडे ,शिवाजीराव राखुंडे , जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक मानसिंग खंडागळे , मार्केट कमिटीचे माजी सचिव दत्तात्रय क्षीरसागर ,आबासाहेब शिंदे ,योगेश बोराडे ,संजय ठाकर ,भरत सरडे ,अनिल सुरवसे ,प्रवीण भोसले ,रघुनाथ केकान ,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर ,सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!