मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास तालुक्यातील जनतेचा उस्फुर्त पाठींबा – शंभूराजे जगताप
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मनोज जरांगे-पाटील यांनी (आंतरवाली सराटी जि.जालना) या ठिकाणी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास करमाळा शहरासह तालुक्यातील जनतेचा उस्फुर्त जाहीर पाठींबा असून, त्याचाच एक भाग म्हणून जगताप गटाचे यूवा नेते शंभूराजे जगताप यांनी गट-तट-पक्ष बाजूला ठेवून आंतवालि येथील जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होवून करमाळा तालुक्यातील ६० वाहनांमधून शेकडो यूवक व नागरीक सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना श्री.जगताप यांनी सांगितले कि, मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजासाठी निस्वार्थपणे जन आंदोलन करून जो लढा उभारलेला आहे. त्यास फक्त मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण अठरापगड जातीच्या बांधवांचा सुद्धा पाठिंबा आहे . मराठा समाजातील कित्येक लोक आजही खूप मागास आहेत.
शिक्षण घेण्यासाठी मराठा युवकांना आरक्षणाची गरज आहे, गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील यूवकांना नोकरी मिळत नाही, हा खूप मोठा अन्याय आहे जरांगे पाटलांची आरक्षणाची मागणी न्याय्य असून त्यामध्ये तिळ मात्र स्वार्थ दिसत नाही, तालुक्यातील सर्व जाती -धर्माच्या लोकांचा मराठा आरक्षण जनआंदोलनास पाठींबा असून स्वातंत्रपूर्व काळापासून करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात मराठा बांधवां सह सर्व जाती धर्मा सोबत जगताप गट नेहमीच राहीला आहे .
याचाच एक भाग म्हणून जगताप गटाचे यूवा नेते शंभूराजे जगताप हे बाजार सामिती चे संचालक दादासाहेब लबडे आणि सागर दोंड यांनी मराठा आंदोलनास पाठींबा देण्यासाठी १२ जून रोजी करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजातील युवक व बुजुर्ग नागरिकांना करमाळा येथून आंतरवाली सराटी येथे जावून आरक्षण आंदोलनास पाठिंबा द्यायला जाण्यासाठी आवाहन केले होते, यामध्ये शंभूराजे जगताप यांनी गट – तट – पक्ष बाजूला ठेवून करमाळा तालुक्यातील ६० वाहनांमधून शेकडो युवकांना घेवून आंदोलनात सहभागी झाले होते.