औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवा शक्ती करिअर शिबीर संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करियर शिबीर आज (ता. २४) संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड.बाबूराव हिरडे, ग्लोबल सायन्स अकॅडमीचे निकत, अकलुज प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दाजी भासे, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र राठी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र आवाडे हे होते.

यावेळी दाजी ओंभासे, डॉ.ॲड.बाबूराव हिरडे, प्रा. गणेश करे-पाटील, प्रा. निकत व सौ. निकत, सचिन धुमाळ आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीताबाई भगवान परदेशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया भागवत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मणेरी,प्रा.परदेशी यांनी केले.



