सव्वापंधरा वर्षाच्या मुलीस पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : वडशिवणे (ता. करमाळा) येथील सव्वापंधरा वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. हा प्रकार १८ जून ला घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की माझी सव्वापंधरा वर्षाची मुलगी वडशिवणे येथे विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती.
१८ जुनला ती शाळेत जाती म्हणून गेली त्यानंतर परत आलीच नाही. शाळेत चौकशी केली असता ती शाळेतच आली नाही; असे शिक्षकांनी सांगितले. यावरून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.




