केम येथील महादेव मंदिराच्या सभामडंपसाठी आमदार फंडातून निधी मंजूर

केम (संजय जाधव) – केम येथील बऱ्याच दिवसापासून प्रलंबीत महादेवाचा मंदिराचा सभामडंप आमदार संजय मामा शिंदे यांच्या आमदार फंडातून मंजूर झाला आहे अशी माहिती राष्टवादी महिला आघाडीच्या तालुका कार्याध्यक्षा सौ पल्लवी सचिन रणश्रृंगारे यांनी दिली. सदर कामाचे अंदाज पत्रक सादर करण्याचे आदेश संबधित खात्याने दिले आहेत यासाठी सचिन रणश्रृंगारे यानी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडै वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
सदर मंदिर केम-भोगेवाडी जुना रस्त्याच्या कडेला पठाड शिवारात वसले आहे. याचा फार मोठा इतिहास आहे बैलाच्या पयात एक खडा आला होता. तो पठाड शिवारात पडला. या दगडाची लहान पिंड तयार झाली ती हळू हळू मोठी होत गेली त्या ठिकाणी पठाडामधील पुवींच्या शिवारकऱ्यानी छोटेसे मंदिर बांधले ज्या वेळेस केम येथे पाऊस नसतो त्या वेळेस देव हा सप्त लिंगात असतो त्या वेळेस श्री उत्तरेश्वर बाबाची पालखी काढली जाते हि पालखी मलवडी येथील रामेश्वराला भेटून घुटकेश्वर येथे विसावा घेऊन पालखी पठाड शिवार चढून पालखी महादेवाच्या मौदिरात येते त्या वेळेस या पालखी सोबत हजारो भाविक असतात त्या वेळेस मंदिर लहान असल्याने भाविक उन्हात पठाड शिवारात थांबायची आता मंदिराला सभामंडप मिळाल्याने भाविकांची सोय होणार आहे. तसेच भोगेवाडीहून येणारे नागरिकाना थांबण्याची सोय झाली.

या वेळी महादेवाचे भक्त अंकुश महादेव जाधव डाॅ संदिप सुरवसे कैलास सुरवसे दत्तात्रय बिचितकर,केमेश्वर सुरवसे उपस्थित होते. महादेवाच्या मौदिराला सभा मंडप मंजूर केल्याबदृल आमदार संजय मामा शिंदे यांचे नागरिकानी कौतूक केले.




