उमरड -विहाळ रस्त्यावरील ओढ्या वर पूल बांधावा
केम (संजय जाधव) – उमरड ते विहाळ रस्त्यावरती उमरड हद्दीमध्ये ओढ्यावरती तत्काळ पूल बांधावा या मागणीचे निवेदन बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी सोलापूर यांना नायब तहसीलदार विजय लोकरे करमाळा यांच्यामार्फत दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओढ्याच्या उत्तर दिशेला सुमारे 100 वस्त्या आहेत. तिथे साधारण पाचशे लोकसंख्या रस्त्यावरून ये जा करते ओढ्यामध्ये तीन फूट पाणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गैरसोय होते विद्यार्थ्यांना शाळेत जाणे बंद झाले आहे स्त्रियांना पाण्यातून जाता येत नाही मोटार सायकल पाण्यातून नेहता येत नाही त्यामुळे लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे जिल्हा परिषद बांधकाम खात्याने तत्काळ जाण्या-येण्यापुरता सिमेंटच्या नळ्या टाकून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पुलाची व्यवस्था करावी.
लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधण्याची व्यवस्था करावी अन्यथा बहुजन संघर्ष सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित माजी सरपंच संदीप मारकड, अशोक रामा बदे, इंद्रजीत हनुमंत बदे, परशुराम साहेबराव बदे, शांतीलाल कांतीलाल कोठावळे, किरण देविदास बदे, गोवर्धन दादा कोठावळे, इरफान शेख, इसाक शेख, शंखर लोखंडे, ज्ञानेश्वर बदे आधी जण उपस्थित होते.