भारत हायस्कुलमध्ये दिलीप राऊत यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
करमाळा (दि.४) – जेऊर येथील भारत हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज संस्थेच्या व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत कार्यरत असणारे सेवक दिलीप धोंडिबा राऊत यांचा सेवापूर्ती सोहळा ३१ ऑगस्ट रोजी भारत हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी श्री. राऊत यांचा सपत्निक सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष माजी सरपंच अनिल कुमार गादीया, संचालक श्री पाथ्रुडकर व ग्रामपंचायत सदस्य संदीप शेठ कोठारी,संचालक सुनील तळेकर व संस्था सचिव प्रा.अर्जुनराव सरक, श्री दहिभाते,श्री एन डी कांबळे, पर्यवेक्षक श्री शिंदे, मुख्याध्यापक श्री व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.