गणपती मिरवणुक मार्गावरील अडथळे दूर करण्यात यावे -मुख्याधिकारी यांना निवेदन
करमाळा (दि.६) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील सर्व गणेश मंडळांना मिरवणूक मार्गावर येणारे अडथळे व अडचणी तात्काळ दूर करा या मागणीचे निवेदन युवासेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)करमाळा तालुका समन्वयक कुमार माने यांनी करमाळा नगर परिषदचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असून. करमाळा शहरातील प्रमुख रस्त्यावर तसेच श्री गणेशमूर्ती स्वागत व विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या मोठया खड्ड्यांमध्ये पाणीसाचत आहे.श्रीगणेशाचे ७ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. या निमित्ताने शहरात व तालुक्यात मोठ्या जल्लोषात श्रीगणेशाचे स्वागत केले जाते तरी लवकरात लवकर मिरवणुक मार्गावरील मोठे खड्डे तात्काळ बुजवुन घ्यावे.
तसेच मिरवणूक मार्गावरील जे विद्युत तारा खाली आल्या आहेत त्याचीही दुरुस्ती करून घ्यावी आणि मिरवणुक मार्गावरील काटेरी झाडे झुडपे व झाडावरील फांद्या अडचणीचे ठरत आहे व मिरवणुक मार्गावरील स्वच्छतेचे काम करून घ्यावीत मिरवणुकी प्रसंगी मंडळांना याचा त्रास होतो. वरील सर्व विषयाचे योग्य ते नियोजन करणे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवा सेना तालुका प्रमुख शंभुराजे फरतडे, युवा सेना शहर प्रमुख समीर हलवाई, उपशहर प्रमुख अनिकेत केंगार,कल्पेश राक्षे,आदित्य जाधव, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, किशोर पवार, गणेश राखुंडे, विघ्नेश कोतमिरे,अक्षय पोळ, हे उपस्थित होते.