“गोर गरिब रूग्णांचा कैवारी हरपला”
कै. डाॅ. प्रदिपकुमार बुवासाहेब पाटील अत्यंत साधे, सरळ, प्रमाणिक व हुशार असे व्यक्तीमत्व. कधी डाॅ. असल्याचा फारसा दिमाख वा बडेजाव त्यांनी कधीच दाखवला नाही. पेशंटला डाॅ. नेहमी मित्रासारखे वाटत. त्यांचे वडील कै.बुवासाहेब जाधव बी.एम.पाटील सर हे तरडगाव येथील खेड्यातील रहिवासी. पण ते बी. एस्सी बी. एड.शिक्षक. तेही अत्यंत प्रामाणिक व सरळमार्गी शिक्षक. ते करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात गणित व विज्ञान विषयाचे अध्यापण करत. वडील शिक्षक असल्याने सहाजिकच मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे हि त्यांची मनोकामना.
थोरला मुलगा डाॅ. प्रदिपकुमार तर त्यांचे लहान बंधू संतोष हे बी. फार्म झाले. दोन्ही मुले आरोग्य क्षेत्रात उतरली. डाॅ. प्रदिपकुमार जाधव-पाटील यांचा दवाखाना करमाळा मुख्य (मेन रोड) रस्त्यावर साधारण 1980 चे दरम्यान सुरू केला . करमाळा शहरात त्यावेळी मोठी (MBBS) पदवी घेतलेले दवाखाने होते. पण डाॅ. प्रदिपकुमार यांनी आपले हाॅस्पिटल सुरू केल्यापासून त्यांचा दवाखाना जो सुरू झाला तो दरदिवशी प्रगती करत राहीला.
फि अत्यंत कमी व गुण हमखास देणारे डाॅक्टर म्हणून त्यांची ओळख झाली. दवाखान्यात पाय ठेवायला जागाच शिल्लक नसे. दिवसभरात किती बाहय रूग्ण तपासलेत हे त्यांनाही कळत नसे…..! कारण त्यांचेकडे रूग्णाचा नंबर लिहीण्याची वहीच नसे. डाॅ. प्रदिपकुमार अबालवृद्धांचे पण खेड्यातील गोरगरिबांचे जाणकार व गुणकारी डाॅ. होते.
डाॅ. प्रदिपकुमार हे “सर्पदंशा”वरील तज्ञ (special) होते. 80….90चे दशकात सर्पदंश झाला की, पेशंट जगेल वाचेल यांची काहीच गॅरंटी नव्हती. पेशंटला सोलापुर, अहमदनगर नेहण्या- शिवाय पर्यायाच नव्हता. प्रवासी साधन फारसी नव्हती. जी होती ती गोरगरिब रूग्ण नातेवाईकांना परवडणारी नव्हती. त्यावेळी डाॅ. प्रदिपकुमार हिंमतीने उपचार करू लागले व सर्पदंशाचे पेशंटला मृत्युचे दारातून परतवून आणनारे,पेशंटला पुर्नरजन्म देणारे डाॅ. म्हणून त्यांचा नावलैकीक झाला. “सर्पदंश म्हणजे मृत्युच” हे समिकरण डाॅ. प्रदिपकुमार यांनी पुसूनच टाकले.डाॅ. नी कमीत कमी आकारलेली फी नातेवाईक फारच गयावया करू लागला तर जे काय आणलेत ते जमा करूण घेत व पेशंटला हासत खेळत डिसचार्ज देत. हा रिवाज करमाळा शहरात कुठेच नव्हता व पुढेही आढळणार नाही.
वैद्यकीय क्षेत्रातील ब्रीद “रूग्णालय प्रथम सेवा” हे ब्रीद डाॅ. प्रदिपकुमार यांनी आयुष्यभर पाळले. कोणत्याही रुग्णांची कधीच अडवणुक केली नाही. बहुतांश गोरगरिब पेशंटला औषध खरेदीला व एस. टी.ला गावी जायलाही पैसे देत. खेड्यातील गोरगरिब बाजारहाट अडी अडचणीलाही डाॅ. कडून पैसे घेत. विशेष म्हणजे त्यांचेकडे उधारी मांडण्यासाठी वहीची पद्धतच नव्हती. दिवसाकाठी 7-8 पेशंटना मोफतच सेवा चालत असत. डाॅ. नी “रूग्ण सेवा ईश्वर सेवा”
म्हणुनच सेवा केली. पण कोणत्याही पेशंटची बिलासाठी कधीच अडवणुक केली नाही.
डाॅ. प्रदिपकुमार पुढे आमदार कै. दिगंबर बागल यांचेमुळे सहकार क्षेत्रात ओढले गेले. साधारण 1993 दरम्यान करमाळा तालुक्याचे “विकास पर्व” म्हणून ओळखले जाणारे आदिनाथ सहकारी कारखान्याचे ऐन तारुण्याचे उमेदित 35 वे वर्षी चेअरमन झाले. त्यांचे कालखंडात आदिनाथने भरीव व उच्चांकी गाळप केले. आज असणारी एकही समस्या डाॅ. चे कालावधीत कधीच आली नाही. ते आदिनाथचे सलग 25 वर्षे संचालकही राहिले.
डाॅ. प्रदिपकुमार जरी विज्ञान क्षेत्रातील जाणकार होते तरी हयातभर ते आई कमलाभवाणी मातेचे निस्सिम भक्त होते. दवाखाणन्यात कीतीही गर्दी असली तरी सकाळी प्रथम ते दर्शन घेवून आल्यानंतरच रूग्ण सेवेला सुरूवात करत. कदाचित कमला भवानी आई त्यांचे “आराध्य दैवत”च होते. दिवसभरासाठी लागणारी सेवा ,प्रेरणा, परोपकार व लागणारी उर्जा त्यांना तेथूनच मिळत असावी. डॉ.पाटील हे कमला भवानी मंदिर देवीचामाळचे विश्वस्त (trusti) होते. सातत्याने रंगरंगोटी व विकासात्मक कामे तिथे होत आहेत. मंदिर “ब” वर्ग श्रेणीत वर्ग झाले आहे.
डाॅ. आपला व्यवसाय सांभाळून तरडगावचे शेतीवर लक्ष देत असत. शेतीवर पशुपालन व वेगवेगळे प्रयोग करूण भरघोस उत्पादन शेतीत घेत असत. डाॅ. ना लहान भाऊ संतोष असून तेही औषध निर्माण क्षेत्रातच सेवा देतात. डाॅ. ना दोन मुले पैकी एक बी.फार्म असून शेती क्षेत्रात स्थिरावला आहे तर दुसरा डाॅ. रोहण जाधव हे रशियात एम. बी. बी. एस. एम. डी आहेत. तेही वडीलांचा डाॅ. चा रूग्ण सेवेचा व्यवसाय मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलचे माध्यमातून पुढे चालवत आहेत.