करमाळा येथे तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले
करमाळा (दि.७) – करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागा मार्फत शुक्रवार (दि.6 सप्टेंबर) रोजी तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उदघाटन कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी जयवंत नलवडे उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ग्रंथ प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती होऊन सदर पुस्तक वाचनातून त्यांच्या ज्ञानात भर पडून एक वैचारिक चळवळ निर्माण होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पुस्तकांच्या माहितीचा खजिना असून यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनात भर पडणार आहे. त्याचबरोबर त्यांचे ज्ञान समृद्ध होणार आहे .सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये वाचनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हे ग्रंथ प्रदर्शन नक्कीच उपयोगी ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास सुरुवातीस विद्यार्थ्यांसोबत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लेखिका प्राध्यापक अंजली श्रीवास्तव या उपस्थित होत्या. सदर ग्रंथ प्रदर्शनात करमाळा तालुक्यातील नवोदित कवी व लेखक यांचा सन्मान करण्यात आला. या ग्रंथ प्रदर्शनासाठी करमाळा शहरातील सर्व शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी व तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री जयवंत नलावडे विस्ताराधिकारी श्री नितीन कदम व श्री मिनीनाथ टकले अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील जाधव उपमुख्याध्यापक श्री दत्तात्रय भस्मे नवोदित कवी श्री दीपक लांडगे व श्री शाम माने तसेच लेखक श्री अजित कणसे श्री संतोष पोतदार विषय साधन व्यक्ती श्री कैलास जाधव श्री प्रवीण बांगर व तालुका समन्वयक श्री अशोक माने ही उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषयसाधव्यक्ती श्री रेवणनाथ आदलिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मिनीनाथ टकले यांनी केले.