सुनंदा जाधव यांना आदर्श सक्षम महिला पुरस्कार जाहीर
करमाळा (दि.८) – महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा सन २०२३ – २४ चा आदर्श सक्षम महिला पुरस्कार नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक शाळा मुले नं. च्या मुख्याध्यापिका सुनंदा सुरेश जाधव यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारासाठी १४५ प्रस्ताव आले होते, त्यामध्ये सौ. जाधव यांची निवड झाली आहे. मुख्याध्यापिका माने यांनी आदर्श शाळा करून शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. यात विज्ञान प्रदर्शन, आनंदी बाजार, भौगोलिक सहल, शालेय दिंडी, विविध स्पर्धा, पर्यावरण वृक्ष जागृती व पर्यावरण विषयक उपक्रम, याचबरोबर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम शाळेत राबविण्यात आले. त्याची दखल घेऊन सौ. जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.