करमाळा तालुका प्राथ. शिक्षक सह. पतसंस्थेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
करमाळा (दि.३०) – करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सभागृहात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री आदिनाथ देवकते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
संस्थेचे एकूण ६५३ सभासद असून संस्था ऑडिट वर्ग ‘अ’ मध्य मोडते. यावेळी सभेमध्ये कर्ज मर्यादे मध्ये वाढ करून १२ लाख रुपयांची कर्ज मर्यादा करण्यात आली, नवीन इमारत बांधणे, पाच लाख रुपयांचा मयत निधी यासह इतर अनेक विषयांना मंजुरी घेण्यात आली. संस्थेतील ठेवींना ८ % दराने व्याज देण्यात येते. तसेच सभासदांच्या शेअर्सवर ७ % दराने लाभांश वाटप करण्यात आला. यावेळी नवोदय पात्र, शिष्यवृत्ती, दहावी, बारावी वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी सभासद पाल्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संचालक प्रताप काळे, अरुण चौगुले, तात्यासाहेब जाधव, अजित कणसे, साईनाथ देवकर, सतीश चिंदे, निशांत खारगे, हनुमंत सरडे, वैशाली महाजन, पुनम जाधव, तज्ञ संचालक वसंत बदर, दिपक जाधव, सहसचिव रमेश नामदेव, बाळासाहेब दुधे आदीसह, संस्थेचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष तात्यासाहेब जाधव, अध्यक्षीय भाषण आदिनाथ देवकते यांनी, सभेपुढील विषयांचे वाचन संस्थेचे सचिव अजित कणसे यांनी तर आभार अरुण चौगुले यांनी मानले.