येत्या काही काळात 'मकाई' पुनर्वैभव प्राप्त करेल - रश्मी बागल - Saptahik Sandesh

येत्या काही काळात ‘मकाई’ पुनर्वैभव प्राप्त करेल – रश्मी बागल

करमाळा (दि.३०) – मकाई कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून आम्ही केवळ विश्वस्त या नात्याने भूमिका बजावत आहोत. लोकनेते व राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांनी मकाईच्या रूपान एक वारसा परंपरा आपणा सर्वांचे हातात जतन करण्यासाठी दिला आहे. मकाईचं संरक्षण व संवर्धन करणे ही आमची प्रामुख्याने जबाबदारी असून आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे येत्या काही काळात आपणा सर्वांच्या सहकार्याने मकाई पुनर्वैभव प्राप्त करेल असा विश्वास आज भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी येथे व्यक्त केला.

आज श्री. मकाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आदिनाथ चे व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यानंतर मुख्य सभेला सुरुवात झाली प्रारंभी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले त्याला उपस्थित सर्व सभासदांनी दोन मिनिटे शांत उभे राहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका माननीय रश्मी बागल यांनी मकाई कारखान्याच्या एकूण कामकाजाचा आढावा घेत येत्या काही काळात मकाई कारखाना आपणा सभासदांच्या सहकार्याने निश्चितपणे पुनर्वैभव प्राप्त करेल हे रोपट स्वर्गीय मामांनी लावलेल आहे हा वारसा आणि परंपरा जतन करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्या सहित सर्वांची आहे. मकाईकडे जर कोणी राजकारणाच्या दृष्टीने मुद्दामहून टीका करून बदनाम करत असेल तर हे यापुढील काळात सहन केले जाणार नाही. त्याला जशास तसे पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा देखील रश्मी बागल यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, मकाईच्या प्रगतीसाठी प्रसंगी आम्ही आमची बागल कुटुंबाची प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे. आम्ही संस्था विकत नाही तर आम्ही संस्था प्रामाणिकपणे चालवण्याचा प्रयत्न करतो आमच्यावर स्वर्गीय मामांचे संस्कार आहेत. असाही टोला त्यांनी कोणाचे नाव न घेता यावेळी दिला कामगारांची देणी तोडणी वाहतूकदार व सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य राहणार असून मकाई कारखाना लवकरच पुनर्वैभव प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बागल कुटुंबीयांची बांधिलकी ही सभासदांचे कामगारांचे व तोडणी वाहतूकदारांचे हित जोपासण्याचीच आहे. मकाई मध्ये जर मुद्दाम कोणी राजकारण आणत असेल तर ते सहन केले जाणार नाही. 

यावेळी विषय वाचन संस्थेचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी केले सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली त्यानंतर आभार प्रदर्शन संचालक कल्याण सरडे यांनी केले तर राष्ट्रगीत गायन व सभेचे सूत्रसंचालन माननीय रश्मी बागल यांचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत कार्यालईन अधिक्षक लहू बनसोडे यांनी केले. 

यावेळी केरू गव्हाणे, संचालक बाळासाहेब भाऊ पांढरे, चेअरमन धनंजय डोंगरे, संचालक सतीश निळ, युवराज रोकडे, रेवननाथ निकत, गणेश झोळ, अजित झांजुर्णे, जयदीप देवकर वकील, अशोक बाप्पा पाटील, गणेश तळेकर, महेश तळेकर, बापू चोरमले ,अनिल अनारसे, विलास काटे, अनिल मामा शिंदे, रामचंद्र हाके, दिनकरराव सरडे, गोवर्धन करगळ, नवनाथ बागल, राजेंद्र मोहोळकर, आशिष गायकवाड,अमोल यादव,सचिन पिसाळ,संतोष पाटील,नंदू भोसले,प्रकाश पाटील,बापू कदम,विष्णू माने, आदी संचालकांसह मकाई चे सर्व विभाग प्रमुख कामगार संस्थेचे सभासद, पत्रकार मीडिया प्रतिनिधी, तोडणी वाहतूकदार आदी बहुसंख्येने उपस्थित होते. 

मकाईचे माजी चेअरमन बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!