मालधक्का बंद केल्याने कुंकू कारखानदार अडचणीत
केम (संजय जाधव) – देशात प्रसिद्ध असलेल्या केमच्या कुंकवाची वाहतूक व्यवस्था रस्त्याच्या अभावी कोलमडलेली आहे रेल्वेचा पूल डोकेएदुखी बनलेला असून केम येथून मुंबई चेन्नई रेल्वे मार्ग असूनही या स्टेशनवर माल धक्का नसल्याने कुंकू कारखानदार अडचणीत सापडले आहेत. पूर्वी या ठिकाणी कुंकवाच्या वाहतुकीसाठी गोडाऊन होते. त्यामुळे येथील कुंकू कारखानदार कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात व इतर राज्यात रेल्वेने कुंकू पाठवत होते. परंतु रेल्वे विभागाने पार्सल मालधक्का बंद केल्याने कुंकू कारखानदार अडचणीत आले आहे.
केम येथील कुंकू कारखाने दळण अभावी शहराकडे स्थलातंर होऊ लागले आहे. तरी केम स्टेशनवर माल धक्का सुरू करावा अशी मागणी कुंकू कारखानदारानी केली आहे. केम येथे 25 कुंकू कारखाने आहेत कारखान्यातून दररोज 25 ते 30 टन कुंकवाची निर्मिती होते. दरमहा 20 ते 22 कोटी उलाढाल होते तीर्थक्षेत्राला येथील कुंकूवाला मोठी मागणी असते ). कुंकू बाहेर बाजारात पाठवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नसल्याने कारखानदारासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. केम गावला येणारा एकही रस्ता नीट नाही व रेल्वेचा पूल अरुंद आहे यामुळे या पुलात गाड्या बसत नाहीत तसेच केम कंदर टेंभुर्णी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे मोटरचालक वाहतूक करण्यासाठी तयार होत नाही. शिवाय वाहतूक भाडे जास्त मागणी करतात. त्यामुळे कारखानदाराला नुकसान सहन करावे लागते.
तसेच केम रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा नसल्याने त्यामुळे येथील कुंकू कारखानदारांना कुर्डूवाडी येथून प्रवास करावा लागतो व कुंकवाची वाहतूक सुद्धा कुर्डुवाडी, किंवा सोलापूर स्टेशन वरून करावी लागते. कुंकवाचे वाहतुकीसाठी मालधक्का मंजूर केल्यास रेल्वेला उत्पन्नही वाढेल व कारखानदाराची सोय होईलआता सध्या सोलापूरला जाण्यासाठी सकाळी केम येथून एकही रेल्वे नाही त्यामुळे प्रवाशांची व्यापाऱ्यांची विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
केम हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे व कुंकवासाठी देशभरात प्रसिद्ध आहे येथून भारता मध्ये सर्वत्र कुंकू रवाना करण्यात येते परंतु केम ला येणारा एकही रस्ता नीट नसल्यामुळे मोठ्या गाड्या येत नाही तसेच पूर्वी येथून रेल्वेने कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश व गुजरात रेल्वेने पार्सल कुंकू भंडारा इत्यादी माल पाठवण्यात येत होता परंतु रेल्वेने पार्सल बंद केल्यामुळे आता ट्रक द्वारे माल पाठवण्यास येतो यामुळे वाहतूक खर्च वाढतो तरी रेल्वे प्रशासनाने केम येथे माल धक्का मंजूर करावा यामुळे केम येथील कुंकू कारखानदार व जवळच असलेले टेंभुर्णी एमआयडीसी येथील कंपनी यांना केम स्टेशनवरून माल आयात निर्यात करण्यासाठी सोयीचे व जवळचे स्टेशन होईल.
- मिलींद नरखेडकर, सचिव, श्री उत्तरेश्वर औदयगिक वसाहत केम
केम रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा नाही त्यामुळे येथील कारखानदारांना कुर्डूवाडी येथून प्रवास करावा लागतो. कुंकवाची वाहतूक सुद्धा कुर्डूवाडी किंवा सोलापूर स्टेशन वरून करावे लागते. कुंकवाच्या वाहतुकीसाठी मालधक्का गाडी मंजूर करावी यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
- अजित तळेकर, माजी सरपंच, केम